कार्यक्रमाद्वारे महिलांच्या सामर्थ्याचा मान्यवरांकडून गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पंडित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एन.एस.ॲडव्हायझरी आणि मू.जे.महाविद्यालय इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त उपक्रमात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमात जळगाव शहरातील कला, सामाजिक, शैक्षणिक, विधी, वैद्यकीय, उद्योजक क्षेत्रातील २५ महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाद्वारे महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश पोहचला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंडित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डाॅ. मंदार पंडित, जवान फाउंडेशनचे ईश्वर मोरे, एन.एस.ॲडव्हायझरीचे संचालक निखिल गडकर, ॲड. हेमंत भंगाळे, अमित माळी, शिल्पा फर्निचरचे संचालक प्रीतमकुमार मुणोत, मनोज सुरवाडे आदी उपस्थित होते. यावेळी अमेय कुलकर्णी, बुद्धभूषण मोरे, अंजली धुमाळ, प्रमोद जोशी, अमित माळी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले.
सन्मानार्थी २५ महिला
सन्मानार्थी २५ महिलांमध्ये शैला चौधरी, स्वाती कुलकर्णी, डॉ.पूजा सोमाणी, डॉ.योगिता कोळंबे, ॲड.विजेता सिंग, ॲड.मनीषा महाजन, मंजुषा अडावदकर, सुनीता येवले, ज्योती राणे, उमा बागुल, प्रियंका बोरसे, रजनी पगारिया, सुवर्णा पाटील, नूतन राऊत, नीलम अंभोरे, प्रा.विशाखा गणवीर, डॉ.अंजली नेवे, अंजली तिवारी, अंजली धुमाळ, सुरेखा जोशी, संगीता मोरे, दीपाली सुरवाडे, अश्विनी निकम-जंजाळे, गायत्री महाले यांचा समावेश आहे.