साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
केसीई सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एम. जे. कॉलेज कॅम्पसमधील नवीन सभागृहात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्य साधून पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी खेळाडूंना खेळ व फिटनेस उपक्रमाबाबत शपथ देण्यात आली.
याप्रसंगी आ.राजूमामा भोळे, क्रीडा मार्गदर्शक तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त किशोर चौधरी, भारतीय शूटिंग संघाचे प्रशिक्षक दीक्षांत जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, सचिव ॲड. पी.एन. पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. मृणालिनी फडणीस, प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांचा विद्यार्थ्यांना उद्देशून संदेश ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी वाचून दाखविला.
यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे लाभले सहकार्य
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच आंतरविद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील, मु. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यशस्वीतेसाठी एकलव्य क्रीडा संकुलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक ॲड. प्रवीणचंद्र जंगले तर आभार डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी मानले.



