महाविद्यालयाचा परिसर स्वच्छता घोषणांनी दणाणला
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
येथील बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए.सायन्स,के.के.सी.कॉमर्स कॉलेज तसेच चाळीसगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता साखळी तयार केली. उपप्राचार्य प्रा. डी.एल.वसईकर यांनी स्वच्छतेची शपथ सर्व उपस्थितांना दिली. संपूर्ण महाविद्यालय परिसर स्वच्छता घोषणांनी दणाणून गेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही.बिल्दिकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत राष्ट्रीय सेवा योजना दिवस आणि स्वच्छतेचे महत्त्व विषद केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए. व्ही.काटे, उपप्राचार्य डॉ.खापर्डे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. आर. बोरसे, एनसीसी विभाग प्रमुख डॉ.चंदनशिव, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.प्रभाकर पगार तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपवेळी एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी किरण निकम, ओम पगारे ,चेतन राठोड, नंदकिशोर लोधें, आदित्य जाधव, करण लोंधे, मनोज डोंगरे, प्रणाली जाधव, अर्पिता चव्हाण, गौरव शेळके यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठीमुख्याधिकारी सौरभ जोशी, विद्युत अभियंता कुणाल महाले, ॲड.मुकेश पवार, सिसी करण चव्हाण तथा नगर परिषद कर्मचारी, महाविद्यालयातील एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.दीपाली बंसवाल, प्रा.पंकज वाघमारे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा .मेघराज चुडे, प्रा.किशोर पाटील, सेवक शुभम पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा आभार उपप्राचार्य डी.एल.वसईकर यांनी मानले.