साईमत भुसावळ प्रतिनिधी
येथील काशीराम नगर परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त संगीतमय श्री शिवमहापुराण कथा व किर्तन सप्ताह सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. २ ते ८ मार्च पर्यंत दररोज सकाळी १० ते १२ व दुपारी २ ते ४ : ३० वाजे दरम्यान संगीतमय श्री शिवमहापुराण कथा, तर २ ते ९ मार्च पर्यंत दररोज रात्री ८ ते १० वाजे दरम्यान किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय सोहळ्याच्या कथा श्रवणाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
काशीराम नगर परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात जय बजरंग मंडळाच्या आयोजनातून संगीतमय श्री शिवमहापुराण कथा व तब्बल आठ दिवस हरी भक्त परायण यांच्या रसाळ ओघवत्या वाणीमधून भक्तीरसाचे अमृत भाविकांना प्राप्त होणार आहे. संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे वर्णन ह.भ.प.भागवत महाराज जळगाव यांच्या वाणीतून २ मार्च पासून होईल. सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ ते ७ काकडा आरती , सकाळी १०ते१२ व दुपारी २ ते४.३० संगीतमय श्री शिवमहापुराण कथा , सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ , रात्री ८ ते १० किर्तन असा आहे.
किर्तन सप्ताहात शनिवार २ मार्च रोजी ह.भ.प. देवदत्त महाराज, जळगाव , रविवार ३ मार्च रोजी ह.भ.प. किशोर महाराज, तळवेलकर, सोमवार ४ मार्च रोजी ह.भ.प.दुर्गादास महाराज, खिर्डी , मंगळवार ५ मार्च रोजी ह.भ.प. दिपक महाराज, शेळगांवकर, बुधवार ६ मार्च रोजी ह.भ.प. पुंजोजी महाराज, भालेगांवकर , गुरुवार ७ मार्च रोजी ह.भ.प. शालीग्राम महाराज, चितोडेकर , शुक्रवार ८ मार्च रोजी ह.भ.प. पुजाताई सनांसे, पाडळसेकर, शनिवार ९ मार्च रोजी ह.भ.प. भागवत महाराज, जळगावकर (काल्याचे किर्तन) असे आयोजन आहे. किर्तन सप्ताहात तबला वादक ह.भ.प. भुषण महाराज, शेळावे , हार्मोनिअम बादक ह.भ.प. पवन महाराज, चामगांवकर, गायक ह.भ.प. सुजीत महाराज, जळगाव तसेच जुने सातारे, आराधना कॉलनी, काशिराम नगर, शिव कॉलनी, विठ्ठल मंदिर, खळवाडी आदी भजनी मंडळ सहकार्य करणार आहे.
सप्ताहात सागंतेच्या दिवशी ९ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ वाजे दरम्यान, महाप्रसादाचे वाटप, सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान कथा स्थानावरून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ८ वाजता ह.भ.प. भागवत महाराज, जळगावकर यांचे काल्याचे किर्तन होईल.
या भक्तिमय सोहळ्याच्या कार्यास भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी व सामाजिक कार्यकर्ते गुणवंत बोरोले यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
या कार्यपुर्तीसाठी विशाल मंडळ, जय भवानी मंडळ, आराधना कॉलनी, वेडीमाता मंडळ, सेंटर मित्र मंडळ, शिव कॉलनी मंडळ, सुदर्शन मंडळ, विद्यानगर मंडळ, प्रसन्न मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष संजय नारखेडे, रवींद्र लढे, कपिल लोणारी, संजय भारंबे, प्रमोद भारंबे, जगुभाऊ भारंबे, राजू लढे, अनिल लढे, महेंद्र किनगे, संजय भिरूड, यशवंत जावळे, सरजू सावंत , सुनील भारंबे, चंदकांत बर्हाटे, अशोक कुलकर्णी, योगेश बर्हाटे , दीपक लढे, रितेश कोल्हे, आकाश जोशी, उमेश नारखेडे, सुभाष पाटील, संजय भिरूड आदी परिश्रम घेत आहे.