चोपड्यात छत्रपती शिवजयंतीनिमित्त २१ला विराट हिंदू राष्ट्रजागृती सभा

0
9

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यासारख्या हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी तसेच हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने येत्या बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कोर्टाजवळील खान्देश प्रेस मैदान येथे ‘विराट हिंदू राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन केले असल्याची माहिती सभेच्या आयोजकांनी हॉटेल श्रीनाथ प्राइड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सभेत प्रमुख वक्ता म्हणून तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्ववादी टायगर राजासिंह यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर, रणरागिणी प्रतीक्षा कोरगावकर संबोधित करतील.

यावेळी सर्वश्री अनिल वानखेडे, अमृत सचदेव, राजाराम पाटील, गजेंद्र जैस्वाल, नरेश पाटील, प्रवीण जैन, नरेश महाजन, मनीष गुजराथी, राजू स्वामी, यशवंत चौधरी, प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त चोपडा येथे आयोजित सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणारे फलक, क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, यासह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना याविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे.

हे वर्ष श्री शिवराज्याभिषेकचे ३५० वे वर्ष आहे. सभेसाठी तालुक्यातील १०० हून अधिक गावांमध्ये प्रसार करण्यात येत आहे. विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, रिक्षा उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळ (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार सुरु आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here