साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगांव येथील कै. बाबुरावजी काळे स्कूल मध्ये “आषाढी एकादशी” निमित्त बालवारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी वारकऱ्यांच्या वेशात पोषाख परिधान करून आले होते त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी हा संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत आला असुन विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या चालीवर ठेका धरला व मुला – मुलींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला दिंडी ही शाळेच्या आवारातुन छ.शिवाजी महाराज चौक ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवाजी नगर येथे दिंडीची सांगता झाली.त्यातच विद्यार्थ्यांना फराळ पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती.या दिंडीत शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस, एकनाथ कोलते, प्रणव कुलकर्णी मनिषा पाटील, शितल पगार, आशा पंडित, नम्रता पाटील, पुजा इंगळे, मुश्ताक शहा व ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.दादासाहेब पवार,प्रा.रविंद्र जाधव कमलेश काळे ज्ञानेश्वर पंडीत ,संजय डापके आदी उपस्थित होते