समाजातील सर्व घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचावा तसेच एकाच व्यासपीठावर सुयोग्य विवाहस्थळांची माहिती उपलब्ध व्हावी, अशा सामाजिक हेतूने जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे तृतीय निःशुल्क आंतरराज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिसमागे, एस.टी.स्टँड मागे, जिल्हा पेठ, जळगाव (खान्देश) येथे पार पडणार आहे.
उपक्रमात चर्मकार समाजातील विविध जाती-पोटजातीतील युवक-युवतींसोबत घटस्फोटित, विधवा, विधुर, अंध, अपंग, मूकबधिर आदी सर्वसमावेशक घटकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.कार्यक्रमाला मंत्री संजय सावकारे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आ.राजूमामा भोळे, आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.किशोर पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ. केतकी पाटील यांच्यासह समाजातील विविध अधिकारी, मान्यवर उपस्थित राहतील.
सामाजिक उपक्रमाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय वानखेडे, राज्य संघटक डॉ. संजय भटकर, प्रदेश सहसचिव ॲड. चेतन तायडे, जिल्हाध्यक्ष ॲड. अर्जुन भारुळे, कार्याध्यक्ष राजेश वाडेकर, सचिव प्रा. धनराज भारुळे, गजानन दांडगे, विजय पवार, कमलाकर ठोसर तसेच वधू-वर परिचय समिती प्रमुख केशव ठोसरे, उपप्रमुख बाळकृष्ण खिरोळे यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. सर्व समाजबांधवांना उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करण्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव नेटके, काशीनाथ इंगळे, राजेंद्र बावस्कर, कैलास वाघ, मनोज सोनवणे, पंकज तायडे, खंडू पवार, उमाकांत भारुळे, प्रशांत सोनवणे, सुधाकर मोरे, रतिराम सावकारे आदींनी आवाहन केले आहे.



