गुरुमुळे मिळाली जगाला दिशा : ब्रह्मकुमारी जयश्री दीदी
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
तालुक्यातील आडगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात ओम शांती केंद्रात आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात गुरुजनांचा गौरव करण्यात आला. आडगाव येथील नीलकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.मगरे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना ओम शांती केंद्रात जयश्री दीदी यांनी गौरविले.
यावेळी दीदी म्हणाल्या की, गुरु पौर्णिमेला गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे. गुरुमुळे जगाला दिशा मिळाली आहे. गुरुंनी केलेल्या संस्कारामुळे जगाची प्रगती होत आहे. ब्रह्मा बाबा आमचे गुरु भगवान आहेत, अशा शब्दात त्यांनी गुरूंचा महिमा विशद केला. यावेळी चंद्रशेखर भाई, माणिक पाटील, ईश्वर पाटील यांच्यासह ओम शांती केंद्रातील दीदी, भगिनी तसेच प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.