“नृत्यसंस्कृती” राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ओजल सूर्यवंशी तृतीय

0
67

साईमत जळगाव प्रतिनिधी

नागपूर येथील अखिल नटराजम अंतर सांस्कृतिक संघातर्फे आयोजित “नृत्यसंस्कृती” १३ व्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत जळगाव येथील ओजल निलेश सूर्यवंशी हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

“नृत्यसंस्कृती” नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पंडित राजेंद्र गंगानी, ललिता हरदास, ज्योती पै, शुभलक्ष्मी पाखोटे, अनुजा अमेयराव आदींची उपस्थिती होती. यावेळी ओजल निलेश सूर्यवंशी हिस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी ओजल सूर्यवंशी हिस गुरुवर्य यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांना भेटण्याची संधी मिळाली. ओजल हीस तिचे कथ्थक गुरू अर्चना चौधरी तसेच आई पूजा निलेश सूर्यवंशी वडील निलेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे. ओजल चे वडील निलेश सूर्यवंशी हे पोलीस दलात कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here