Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»बोदवड»कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले
    बोदवड

    कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

    saimatBy saimatAugust 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    तालुक्यातील नाडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाची आ.एकनाथराव खडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली. आ.एकनाथराव खडसे यांनी पुलाची पाहणी करून कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर, बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, रामदास पाटील, किशोर गायकवाड, राजेंद्र माळी, भागवत टिकारे, विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, भरत पाटील, दीपक वाणी, किरण वंजारी, प्रमोद धामोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

    मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावर नाडगाव येथे मध्य रेल्वेची रेल्वे क्रॉसिंग आहे. येथे असलेले रेल्वे गेट तासन्‌‍तास बंद राहते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नाडगाव येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुक्ताईनरचे आ.चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन करत रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करून दिला होता. या पार्श्वभूमीवर आ.एकनाथराव खडसे यांनी कामाची पाहणी केली.

    पुलाचे उर्वरित कामेही अपूर्णावस्थेत

    उड्डाणपुलाची आ. एकनाथराव खडसे यांनी नुकतीच पाहणी केली. त्यावेळी पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले असल्याचे आढळून आले. पुलावर आणि पोहच रस्त्यावर केलेले डांबरीकरण एका पावसात वाहून गेले आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. त्याखालील माती उघडी पडली आहे. तसेच चिखल झाला आहे. पुलाचे उर्वरित कामेही अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.