गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त केली वृक्ष लागवड
साईमत/जामनेर /प्रतिनिधी :
येथील रहिवासी दीपक विजय माळी यांचे लहान बंधू दिलीप माळी (वय ३२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते साडूबा पांडव (छत्रपती संभाजी नगर) यांच्या हस्ते त्यांचा दशक्रियासह गंधमुक्तीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही अकराशे रुपयाची देणगी दिली.
कार्यक्रमास ह.भ.प. देवराम माळी, सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन माळी, समाज सेवक मुकुंदा माळी, कैलास माळी, युवराज माळी, अनिल माळी, नंदू माळी, किरण माळी, आकाश माळी, शेनफडू वराडे, शिवाजी पाटील यांच्यासह समाज बांधव, नातेवाईक, परिवार उपस्थित होते.
यांच्याकडून मिळाली प्रेरणा
कार्यक्रमाचे सर्व उपस्थित बांधवांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा हेच महत्त्वाचे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, विधीकर्ते भगवान रोकडे, शिवदास महाजन, जिल्हा समन्वयक विजय लुल्हे, प्रचारक पी.डी.पाटील, रमेश वराडे यांच्याकडून मिळाली.