ओबीसी समाज ६३ टक्के,खुला प्रवर्ग १६ टक्के

0
32

पाटणा : वृत्तसंस्था

सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या काही महिने आधीच बिहार सरकारने सोमवारी (२ ऑक्टोबर) जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटीहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६३ टक्के लोक हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाचे असल्याचे जनगणनेतून समोर आले आहे.
या जनगणनेत असे दिसून आले आहे की, बिहारमधील १३ कोटी लोकसंख्येपैकी अनुसूचित जातींचा वाटा १९ टयांहून अधिक आहे तर अनुसूचित जमाती १.६८ टक्के इतके आहेत. याशिवाय राज्याच्या लोकसंख्येच्या १५.५२ टक्के लोक उच्च जाती किंवा ‘सवर्ण’ समुदायाचे आहेत. सर्वेक्षणाच्या तपशीलवार विभाजनावरून, राज्यात मागासवर्गीय लोकसंख्या २७ टक्के आहे, तर अत्यंत मागास वर्ग ३६ टक्के इतका आहे.
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत बिहारमध्ये भूमिहार समुदाय २.८६ टक्के आहे, तर ब्राह्मण समुदाय ३.६६ टक्के आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे आहेत, या समाजाची लोकसंख्या २.८७ टक्के इतकी आहे. तसेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे यादव समुदायाचे असून त्यांची लोकसंख्या १४ टक्के आहे. याशिवाय राज्यात मुसाहर समाज ३ टक्के आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here