‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात मलकापूर तालुक्यातून नूतन विद्यालय प्रथम

0
32

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविल्या गेलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात शाळेने १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ अशा ४५ दिवसात विद्यार्थी केंद्रित आणि प्रत्यक्ष सहभागातून शैक्षणिक, शारीरिक, सांस्कृतिक, बौद्धिक, आरोग्य विषयक, पर्यावरण पूरक, आर्थिक साक्षरता, राष्ट्रप्रेम, क्षेत्रभेट आदी उपक्रम राबविले. अभियानात मलकापूर तालुक्यातून मलकापूर लोकसेवा शिक्षण बहुउद्देशिय मंडळाद्वारा संचलित नूतन विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शाळेने यशस्वीपणे राबविलेल्या उपक्रमांमुळे शाळेला बुलढाणा येथे झालेल्या गौरव पुरस्कार समारंभात धीरज लिंगाडे विधान परिषद सदस्य, संजय गायकवाड विधानसभा सदस्य बुलढाणा, श्‍वेता महाले विधानसभा सदस्य चिखली, विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, डॉ. जे. ओ.भटकर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा, ए.बी. आकाळ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बुलढाणा, बी. आर. खरात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. बुलढाणा, व्ही.बी.ठग शिक्षणाधिकारी योजना जि.प. बुलढाणा यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अभियान राबवितांना मलकापूर पं.स.चे गटशिक्षणाधिकारी एन.जे.फाळके, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी प्रभारी घोटाळे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेला सतत प्रेरणा व मार्गदर्शन करणाऱ्या संचालक मंडळामध्ये डॉ. अरविंद कोलते, सुधीर पाचपांडे, अनिल इंगळे यांच्यासह इतर मंडळातील सदस्यांनी कौतुक केले आहे. मलकापूर तालुक्यातून अभियानात नूतन विद्यालय प्रथम आल्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here