नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयाची निकालात यशाची उत्तुंग भरारी

0
107

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झालेला आहे. त्यात नूतन मराठाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.२३ टक्के लागलेला आहे. त्यात कला विभाग ९३.६६, वाणिज्य विभाग ९५.५४, विज्ञान विभाग ९८.१७, किमान कौशल्य विभाग ९६.२३ असा निकाल लागला आहे.

निकालातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कला विभागात प्रथम अनुष्का राजेश काळे ६९.१७, द्वितीय एकता मनोज चांगरे ६९, तृतीय काजल कैलास पवार ६७.३३, वाणिज्य विभागात प्रथम तन्वी उमाकांत चौधरी ७७.३३, द्वितीय तिलक नरेंद्र वाध ७० टक्के, तृतीय गौरव प्रमोद शिंदे ६९, विज्ञान विभागात प्रथम विश्‍वेश विलास पाटील ८८.५०, द्वितीय मिलिंद सदाशिव पाटील ८८.१७, तृतीय अपूर्वा संजय बाविस्कर ८७.८३ अशा यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल ९६.२५ टक्के

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागातून ८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे या विभागाचा निकाल ९६.२५ इतका लागला आहे. प्रथम, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये मांडगे नितीन संतोष ६१.५०, तायडे रोहीत दीपक ५७.८३, अकाऊंट ॲण्ड ऑफीस मॅनेजमेंटमध्ये नाव्हकर चंदन कैलास ६६.३३, मराठे राहूल युवराज ६६.३३, बारी विशाल गोपाळ ६२.५०, लॉजीस्टीक ॲन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये सोनार मयूर शाम ६८ टक्के, रोमाचंक संजय निकम ६६.५० यांचा समावेश आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, चेअरमन गोकुळ बोरसे, सचिव वीरेंद्र भोईटे, प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, उपप्राचार्य संजय पाटील, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक वृंद यांनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here