साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
प्रत्येक गावातील पोलीस पाटील हे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून आतापर्यंत ओळखले जात होते आणि आहे,परंतु आता प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच यांनी आप-आपल्या गावात ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास सुरू असलेल्या घटनांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लावता येईल अशा सूचना वजा नम्रपणे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत केल्याने पोलिसांचा आता चौथा डोळा सक्रिय होणार गुन्ह्यांच्या कामात तात्काळ चौकशी तपास केला जाऊन गुन्हेगार तात्काळ पकडले जाणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा मुळे एखादी गावात ठराविक ठिकाणी घटना घडल्यास आरोपीचा गुन्हेगाराचा शोध लावण्याकामी मोठा पुरावा आपल्या हाती लागेल.आतापर्यंत पोलिसांना प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्याकडून अधिकृतरित्या सर्व स्तरातील माहिती मिळत होती आणि आहे परंतु आता अत्याधुनिक युगात गुन्हेगारी क्षेत्रात गुन्हेगारांनी वेगवेगळे हातखंडे वापरण्यास सुरुवात केली आहे प्रत्येक गावातील नागरिक पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सदस्य आणि इतर सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी हे सुद्धा गुन्हेगारांवर लक्ष ठेवू शकत नाही, कोण केव्हा,कुठे,कोणत्या वेषात, कोणत्या रूपाने काय गुन्हा करून अप्रिय घटना घडवून फरार होईल हे सांगता येत नसल्याने,दिसून येत नसल्याने,समजत नसल्याने ठिकठिकाणी अप्रिय घटना घडत आहेत या विविध घटनांना आळा बसण्यासाठी आणि समाज हितासाठी,जनहीतासाठी आता प्रत्येक गावागावात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास कोणत्या वेळेस कोणती घटना घडली आणि गुन्हेगाराने कोणते हातखंडे कोणत्या प्रकारे वापरले याचा तपास करणे सोयीस्कर होते आणि गुन्हेगार पकडला जातो असे घडलेल्या काही उदाहरणासहित माहिती यावल पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि उपस्थित किनगाव येथील महिला सरपंच,कोरपावली येथील उपसरपंच यांनी आपल्या गावातील घडलेल्या घटना संदर्भात आणि पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांच्या संदर्भात माहिती दिली.
यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांची एक महत्त्वाची बैठक यावल पोलीस स्टेशन आवारात मंगळवार दि.2ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी घेण्यात आली या बैठकीत आपल्या गावातील कायदा सुव्यवस्था शांतता जातीय सलोखा अबाधित कसा ठेवला जाईल याबाबत पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि आपल्या गावात कोणतीही काही घटना घडल्यास तात्काळ यावल पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्या घटनेवर तात्काळ नियंत्रण केले जाते,कोणत्याही जाती-धर्माच्या विविध उत्सव कार्यक्रमात दुसऱ्या जाती धर्मातील नागरिकांच्या भावना दुखावतील अशी देखावे प्रदर्शन करू देऊ नये,सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोणतेही राजकारण पक्षपातीपणा करू नये आणि कोणी केल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी अशा सुद्धा सूचना पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांना देण्यात आल्या.
यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील काही ठराविक समाजसेवक,व्यापारी,नागरिक, देणगीदार कॉन्ट्रॅक्टर यांना विश्वासात घेऊन किंवा ग्रामपंचायतचा कायदेशीररित्या ठराव करून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत व्यवस्था करावी याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
बैठकीत कोरपावली येथील उपसरपंच यांनी यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात ग्रामपंचायतीतर्फे बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्यास(इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट उपलब्ध करून दिल्यास) ते मोफत दुरुस्त करून देईल असे उपस्थितांना आश्वासन दिले.
किनगाव येथील महिला सरपंच यांनी गावातील पशुधन चोरीस गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास कसा लागला याचे स्पष्ट उदाहरण दिले.पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी आयोजित केलेल्या सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याने बैठकीत एक नवचैतन्य निर्माण झाले होते आणि आहे.