नवीदिल्ली ः वृत्तसंस्था
कलम ३०२ हे खुनासाठी, तर कलम ४२० हे फसवणुकीसाठी प्रसिद्ध आहे. ४२० ही संख्या फसवणुकीसंदर्भात एवढी प्रसिद्ध दगाबाज व्यक्तींना ‘४२०’ म्हटले जाते. परंतु, भारतीय न्याय संहिता विधेयक, २०२३, हे १६० वर्षांहून अधिक जुने भारतीय दंड संहिता रद्द करेल आणि त्यात यथोचित बदल करून पुन्हा निर्माण करेल. या पुनर्रचनेमध्ये सामान्यतः प्रसिद्ध असणाऱ्या कलमांसाठी नवीन क्रमांक दिलेले असतील. त्यानुसार कलम ४२० आणि ३०२ ही अनुक्रमे फसवणुकीची आणि खुनाची कलमे असणार नाहीत.
प्रस्तावित भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३ नुसार कलम ४२० हा फसवणुकीचा गुन्हा नसून, तो कलम ३१६ अंतर्गत समाविष्ट आहे. कलम ३१६ (१) नुसार, फसवणूक करणे, फसवणुकीचे वर्तन करणे,अप्रामाणिक वागणे, फसवणूक करण्यास प्रवृत्त करणे यांचा समावेश
आहे.
कलम ३१६ २,३, ४ नुसार फसवणुकीची शिक्षा दंडासह तीन वर्षे, पाच वर्षे किंवा सात वर्षांपर्यंत वाढू शकते.