साईमत मुंबई प्रतिनिधी
एक वर्षांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी रविवारी २ जुलै रोजी बंडखोरी केली आहे. अजित पवार हे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. पण जेव्हा शिंदे गटाने बंडखोरी केली. तेव्हा अजित पवार निधी देत नाहीत. म्हणून आम्ही बंडखोरी केली. असा दावा शिंदे गटाने केला होता.
अजित पवार यांच्या जाचामुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. असे वक्तव्य शिंदे गटाच्या विविध नेत्यांनी केले होते. आता अजित पवार हेच युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे निधी न देणारे अजित पवार युतीत कस ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उत्तर दिले आहे. अजित पवार निधी देत नव्हते म्हणून बंड केले.
आता तेच युतीत कसे काय ? असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे यांनी अगदी थोडक्यात उत्तर दिल. ते म्हणाले, “आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कुठलीही तक्रार राहणार नाही. मीरा भाईंदर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यानी हे विधान कलू आहे. रविवारी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारानी शिंदे-फडणवीस सरकारला 1 पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यानी मंत्रीपदाची शपथ घेतली शपथ घेणाऱ्या नेत्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. धनंजय मुंडे, सुनील तटकर याच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे.