कामाची वर्क ऑर्डर देऊनही काम पूर्ण न करणाऱ्या जळगावच्या ठेकेदाराला नोटीस

0
20

यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील चितोडा, अट्रावल, चिखली ,अंजाळे ,दुसखेडा या १४ किलोमिटर रस्ता कामाची वर्क ऑर्डर देऊनही ठेकेदार वाय.एम.महाजन यांनी ते वेळेत पूर्ण न केल्यामुळे यावल सार्वजनिक बांधकाम उपविभागातर्फे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आपण सदर काम तत्काळ सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा आपण अटी, शर्थींचा भंग केल्याप्रकरणी आपल्याविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसीत म्हटले आहे.
तालुक्यातील चितोडा, अट्रावल, चिखली ,अंजाळे ,दुसखेडा या १४ किलोमिटर रस्त्याचे कामाचे आदेश सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल तर्फे जळगाव येथील कॉन्ट्रॅक्टर वाय.एम.महाजन यांना ४ ऑगस्ट २०२१ रोजी देण्यात आले होते. ते काम ३ ऑगस्ट २०२२ अखेर पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ते अद्यापपावेतो पूर्ण केले नाही. सदरच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी लेखी निवेदन देऊन दिला आहे. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
ठेकेदार महाजन यांना १९ डिसेंबर २०२३रोजी बजावलेल्या नोटीसीत सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे की, सदर रस्ता हा जिल्हा मार्ग दर्जाचा असल्याने लोकप्रतीनिधी नेहमी ते काम पूर्ण करण्याची मागणी करीत आहेत. नुकतेच या उपविभागास अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी निवेदन देवून देऊन अपूर्ण काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आपण त्वरीत काम सुरु करावे अन्यथा आपल्यावर निविदा अटी व शर्ती नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयास सादर करण्यात येईल. तसेच कामास मुदतवाढ़ मिळणेबाबतचा प्रस्तावही द्यावा.
दरम्यान, या पत्राची प्रत तक्रारदार अतुल पाटील यांना देण्यात आली आहे. लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपण उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, असे विनंती करणारे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here