पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरणी पोलीस महासंचालक, जळगाव पोलीस अधीक्षकांना नोटीस

0
16

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जळगावचे पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जळगावचे पोलीस अधीक्षक यांना नोटीस पाठवून २५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी, २५ ऑक्टोबरला होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरून शिवसेना शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शिवीगाळ केली होती. तसेच महाजन यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आ.किशोर पाटील यांनी प्रसार माध्यमांवर व विविध वृत्त वाहिन्यांवर त्यांनी केलेल्या शिवीगाळचे समर्थन केले होते. त्यानंतर किशोर पाटील यांच्या समर्थकांनी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी पत्रकार संदीप महाजन यांना न.पा.समोरील कै. स्वातंत्र सैनिक दामोदर लोटन महाजन त्यांच्या वडिलांच्या नावाच्या चौकातच गाडी अडवून त्यांना जबर मारहाण केली. परंतु याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील सर्व पत्रकारांमध्ये रोष निर्माण झाला होता.

विविध संघटनांकडून गंभीर दखल

राज्य व देशभरातील विविध पत्रकार संघटना, प्रसार माध्यमांनी एकत्रित येत १७ ऑगस्टला राज्यभर निदर्शने केली. सरकारला निवेदने दिली. तरीही सरकारकडून प्रकरणाची दखल घेतली नाही. या सर्व प्रकारांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि मुंबई मराठी देण्यास सांगितले आहे. पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब तसेच अखिल भारतीय पत्रकार परिषद आदी विविध संघटनांनी गंभीर दखल घेतली. तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती गठीत केली. पत्रकार संरक्षण कायदा असूनही आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अखेर याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई उच्च न्यायालयातील विधी तज्ज्ञ ॲड. मंगला वाघे आणि औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधी तज्ज्ञ ॲड. हर्षल रणधीर यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे रिट याचिका दाखल केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here