साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
भाजप- शिवसेनेच्या सत्तेत सोबत आलेल्या अजित पवार यांच्या गटातील अमळनेरचे आ.अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेले आहे. राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडत एकमेकांना पेढा भरवत आनंद साजरा केला.
मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद आल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीला पोषक वातावरण मिळणार आहे. ना.पाटील यांना पालकमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाची गती वेगात होईल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केला आहे.