साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
गणेश विसर्जनाचे औचित्य साधून चाळीसगाव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलनद्वारे पर्यावरण संवर्धनसाठी जनजागृती केली. स्वयंसेवकांनी चाळीसगावात जागोजागी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन निर्माल्य संकलन केले. त्यांनी निर्माल्य, प्लास्टिक बॅग्स इकडे तिकडे फेकून पर्यावरणाला हानी पोहचवू नका, असे आवाहन केले. त्यात रा.से.यो.चे स्वयंसेवक किरण निकम, हरीश बच्छाव, चेतन रावते, नितीन शेवाळे, योगेश महाले, वासुदेव सोनवणे, अनिकेत राजपूत, रोहित देवरे, यशवंत मोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उपक्रमासाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.बोरसे, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.