जामनेरला डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन

0
35

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि.अलिबागद्वारे सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, आतिष झाल्टे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत निर्माल्य संकलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बैठकीचे ‘श्री’ सदस्य उपस्थित होते. तसेच स्नेहदीप गरूड, माजी मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांनीही भेट देऊन कार्याचे कौतुक केले.

जामनेर शहरात निर्माल्य संकलनासाठी दोन गटात विभागणी केली आहे. ती अशी सकाळी १० ते ५, सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत असे ७ ठिकाणी स्टॉल लावून प्रत्येक ठिकाणी साधारण ३० ‘श्री’ सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावून गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांकडून अतिशय नम्रतेने विसर्जनाआधी निर्माल्य घेवून निर्माल्य कलशामध्ये संकलित केले जाणार आहे. ते निर्माल्य तालुक्यातील टाकळी येथे ६ बाय ६ चा मोठा खड्डा तयार केला आहे. त्यात त्याचे कंपोझ खत तयार करणार आहे. तसेच प्रतिष्ठानमार्फत लावलेल्या वृक्षांना देण्यात येणार आहे. निर्माल्य संकलन कार्यक्रमासाठी सकाळी १० ते ५ या वेळेत २०० ‘श्री’ सदस्य आणि १५ वाहने तर सायंकाळी ५ ते रात्री १२ वेळेसाठी ३०० ‘श्री’ सदस्य, १५ वाहने असणार आहेत. जामनेर परिसरातील १६ बैठकीच्या माध्यमातून हे कार्य पार पाडले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here