साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
‘युवारंग’ महोत्सवातील उपविजेत्या ठरलेल्या ‘प्रताप’ महाविद्यालयातील विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार आणि अमोल पाटील यांनी वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. ‘आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा प्रभाव वाढत आहे किंवा नाही’ विषयावरील वादविवाद स्पर्धेत प्रभावी मांडणी करून त्यांनी रसिकांचे लक्ष वेधले. ‘युवारंग’ महोत्सवात यशस्वी ठरलेल्या निर्भय सोनार आणि अमोल पाटील यांना ॲड. सारांश सोनार, प्रा. लीलाधर पाटील, यशपाल पवार, योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
याबद्दल प्राचार्य डॉ.ए.बी. जैन, प्रा.डॉ.नितीन पाटील, डिगंबर महाले, प्रा.डॉ.रमेश माने, प्रा. संदीप नेरकर, प्रा.धीरज वैष्णव, प्रा.जी.एच.निकुंभ, प्रा. कल्पना पाटील, प्रा.विजय तुंटे, सचिन खंडारे, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, डॉ.जी.एम.पाटील, विनोद पाटील, प्रकाश मुंदडा, प्रा.पराग पाटील, मारवडचे फौजदार बाळकृष्ण शिंदे, पत्रकार बांधव, सुवर्णकार समाज यांच्यासह सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
