साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
संविधान आणि कायद्याचे अभ्यासक भाष्यकार ॲड.असिम सरोदे, सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली रविवारी, २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता भडगाव रस्त्यालगतच्या महालपुरे मंगल कार्यालयात लोकशाही….संविधानाचा सन्मान, सुरक्षा, संवर्धन, अंमलबजावणी करीता भारतीय जनमनाकरीता ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन केले आहे.
सभेला सहकुटुंब परिवार, मित्र मंडळी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यवसायिक, वैद्यकीय सेवा, न्यायिक क्षेत्रातील, पत्रकार यांच्यासह जो अस्वस्थ आहे, चिंतीत आहे अशा प्रत्येक भारतीय नागरिकाने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रागतिक नागरी समिती, क्षत्रिय ग्रुप, महापुरुष सन्मान समिती, समविचारी व मित्र मंडळातर्फे केले आहे.
