नऊ जवानांचा सन्मानचिन्हासह वाचनीय पुस्तके देऊन सन्मान

0
19

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने भारतीय सैन्यात सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, एमएसएफ अशा विविध पदांवर निवड झालेल्या नऊ जवानांचा व टॅक्स असिस्टंट पदावर कुमारी दामिनी हिची निवड झाल्याबद्दल सन्मान समारंभ आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी अमळनेर येथील मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पीएसआय नरसिंग वाघ तसेच जानवेचे सरपंच वकील बाबा, उपसरपंच गोपाल पाटील, माजी सरपंच शिवाजी जुलाल पाटील, नवल पाटील, गावातील नागरिक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

निवड झालेल्या जवानांचा सन्मानचिन्हासह वाचनीय पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. यशस्वीतेसाठी कृष्णा पाटील, अनिल पाटील, शरद शेनपडू, पाटील, बाळू पेंटर, वाचनालयाचे कर्मचारी एकनाथ बोरसे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डी.एम.पाटील तर सूत्रसंचालन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here