गावात अस्वच्छतेमुळे पसरली दुर्गंधी, रस्त्यावरच थांबतेय पाणी
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी
तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातील नागरिकांना वारंवार गावातील अस्वच्छता तसेच गटारी नसल्याने गावात होत नसलेला पाण्याचा निचरा यामुळे पाणी रस्त्यावरच थांबत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. कामे होत नसल्याने चक्क निमखेडी खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.
ग्रामपंचायत निमखेडी खु. येथे अस्वच्छतेविषयी नागरिकांनी ग्रामपंचायतीला दोन महिन्यांपासून तक्रारी करून काही उपयोग झाला नाही. सातोड रोडवरील गटार, मुतारी आणि हौदाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिणामी रस्ता पूर्णपणे घाण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी तीव्र भावनेने रस्ता खोदला.ग्रामपंचायत सदस्य अहिलाज घोगरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. आता तरी निमखेडी खु.ग्रामपंचायतीला जाग येईल का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दोन महिन्यांपासून समस्यांकडे दुर्लक्ष
निमखेडी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना गावातील समस्या सांगूनही दोन महिन्यांपासून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रविवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले असल्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य अहिलाज घोगरे यांनी सांगितले.