Jain Sports Academy : जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला ‘सुवर्णपदक’

0
7

३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा वर्चस्व प्रस्थापित

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. त्यात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता दिलीप पवारने ‘सुवर्णपदक’ प्राप्त केले. स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करुन महिलांच्या ५७ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकाविले.

या यशामुळे हैदराबाद येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात तिचे स्थान निश्चित झाले आहे. तिने पहिल्या फेरीत ठाणे, दुसऱ्या फेरीत कोल्हापूर तर अंतिम फेरीत पुणेची खेळाडू श्रद्धा वाल्हेकर हिला नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. निकिताचे या वर्षांतील राज्य स्पर्धेतील लागोपाठ तिसरे सुवर्णपदक आहे तर राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक एक कांस्यपदक तिने पटकाविले. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर, अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

तिच्या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here