नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेस भवनात सत्कार

0
20

साईमत जळगाव प्रतिनिधी

तालुक्यात नुकत्याच  झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे  ग्रामपंचायत सदस्य  निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस तर्फे काँग्रेस भवनात तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तालुका उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अविनाश राजू सोनवणे, विलास कैलास सोनवणे, युवराज दौलत झाल्टे सुधाकर प्रल्हाद सोनवणे संजय दत्तू पाटील,  दिलीप घोलप, संदीप सुरवाडे, समाधान सोनवणे, संतोष सुरडकर, विजय रूपचंद सोनवणे, आकाश संजय मेंढे, किशोर रामकृष्ण वानखेडे, किशोर सोमा सपकाळे, सतीश माणिक इंगळे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत सिद्ध करून सत्ता मिळवली त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पूर्ण ताकदीने सत्तेत येईल हे या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून हे सिद्ध होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here