अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, सचिवपदी विठ्ठल पाटील बिनविरोध
साईमत।भडगाव।प्रतिनिधी
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या भडगाव तालुका पत्रकार संघाची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुनील पाटील, सुधाकर पाटील, सोमनाथ पाटील, संजय पवार, सुनिल कासार, सागर महाजन यांच्या उपस्थित एकमताने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, सचिवपदी विठ्ठल पाटील तर उपाध्यक्षपदी पुरूषोत्तम महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच धनराज पाटील, सहसचिव एस.डी.खेडकर, कार्याध्यक्ष जावेद शेख, प्रसिध्द प्रमुख नितिन महाजन, कायदेशीर सल्लागारपदी भरत ठाकरे, ज्येष्ठ सल्लागार परमेश्वर मोरे, सुरेश कोळी, सदस्यपदी लिलाधर पाटील, भास्कर शार्दुल, आर.के. मिर्झा, सुभाष ठाकरे यांची निवड करण्यात आली. बैठकीत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी भडगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषीत केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी सुनील पाटील, सुधाकर पाटील, सोमनाथ पाटील, संजय पवार, सुनिल कासार, परमेश्वर मोरे, सुरेश कोळी, सागर महाजन, निंबाजी पाटील, नितिन महाजन, लिलाधर पाटील, पुरूषोत्तम महाजन, धनराज पाटील, राजू दिक्षित, सुभाष ठाकरे, भरत ठाकरे, असलम मिर्झा, आर.के.मिर्झा, जावेद शेख, राकेश पाटील, मनोज पाटील, बापुराव शार्दुळ, रमेश धनगर, एस.डी.खेडकर, राजू शेख, नरेंद्र पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.