Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»Chess Association Announced : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर
    क्रीडा

    Chess Association Announced : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 24, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावातून सिद्धार्थ मयूर, रवींद्र धर्माधिकारी यांची वर्णी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जैन हिल्स येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, अधिकृत निरीक्षक ए. के. रायजादा यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी गोंदियाच्या डॉ. परिणय फुके यांची तर मानद सचिवपदी पुण्यातील निरंजन गोडबोले यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये जळगावातून सिद्धार्थ मयूर व जैन स्पोर्टस ॲकडमीचे रवींद्र धर्माधिकारी यांचीही निवड झाली आहे. ग्रॅण्ड मास्टर विदीत गुजराथी, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महिला ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामीनाथन, ग्रॅण्डमास्टर स्वाती घाटे हे संघटनेमध्ये खेळाडू प्रतिनिधी म्हणून काम करतील. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. चंद्रशेखर जामदार यांनी काम पाहिले. निर्वाचित सदस्यांसह राज्यभरातील प्रतिष्ठित जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ.परिणय फुके (गोंदिया) तर कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर (जळगाव), सरचिटणीस निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार भरत चौगुले (कोल्हापूर), उपाध्यक्ष सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली), श्रीराम खरे (रत्नागिरी), सहसचिव सतीश ठाकूर (जालना), डॉ. दीपक तांडेल (ठाणे), अश्विन मुसळे (चंद्रपूर) तर नियुक्त सदस्य म्हणून राजेंद्र कोंडे (उपाध्यक्ष), अंकुश रक्ताडे (सहसचिव) जळगावचे रवींद्र धर्माधिकारी (सहसचिव) यांची निवड केली आहे. निवड झालेल्या सदस्यांचे जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

    राज्यात बुद्धिबळाच्या एका नवीन आणि एकत्रित प्रवासाची सुरुवात झाली. नवीन उपक्रम राबवण्यास, खेळाडूंना सक्षम करण्यास आणि महाराष्ट्रात मजबुत बुद्धिबळ खेळाडू घडविण्यासाठी दूरदर्शी संघ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनी नूतन कार्यकारिणीला दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:अवैध गांजाची साठवणूक करणाऱ्याला संशयिताला अटक

    December 29, 2025

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Jalgaon:रुग्णसेवेचे स्वप्न अपूर्णच…! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.