साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ‘गाव तिथे जनजागृती’ अभियान सोमवारी, १४ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. त्यामध्ये विविध आजारांबद्दल मार्गदर्शन आणि साथीच्या रोगांच्याबाबतीत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप कार्यालयाचे प्रमुख जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले यांनी मार्गदर्शन करुन सूचना दिल्या.
गावामध्ये जाऊन कर्मचाऱ्यांनी कंटेनर सर्वेक्षण जलद ताप सर्वेक्षण आणि रक्ताचे नमुने घेतले. तसेच शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना विविधि आजारांबद्दल आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी यांनी माहिती दिली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना अभियान राबविले जाणार आहे.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी तालुका सुपरवायझर अण्णा जाधव, आरोग्य सहाय्यक दिनकर माळी, विक्रम राजपूत, रवींद्र सूर्यवंशी, राजेश कुमावत, सावकारे भाऊ, परिचारिका रोकडे, परिचारिका उशीर यांच्यासह गावातील सरपंच पोलीस पाटील, शिक्षक व ग्रामस्थ, आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.