‘विनोबा ॲप’वर उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
ओपन लिंक्स फाउंडेशन अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विनोबा ॲप’वर उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हास्तरावरील शिक्षकांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमात ‘पोस्ट ऑफ द मंथ सन्मान’ नेहा तुरे (कापूसवाडी केंद्र, बेटावद, ता. जामनेर), ‘महावाचन उपक्रम सन्मान’ स्पोकन इंग्लिश वर्ग (१ ते ३) वैशाली कदम (रांजणी, बेटावद, ता. जामनेर) यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे संपूर्ण बेटावद केंद्रातर्फे कौतुक होत आहे. तसेच इतर शिक्षकांनीही विनोबा ॲपचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाला जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, श्री.सरोदे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे, वरिष्ठ अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंखे, श्री.दरंदले आदी मान्यवर उपस्थित होते.