Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल तालुक्यात ग्रामीण भागात अनु.जाती /जमातिच्यां लोकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत निळे निशांन सामाजिक संघटनेतर्फे यावल गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन
    यावल

    यावल तालुक्यात ग्रामीण भागात अनु.जाती /जमातिच्यां लोकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत निळे निशांन सामाजिक संघटनेतर्फे यावल गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

    SaimatBy SaimatSeptember 13, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

    यावल तालुक्यात ग्रामीण भागातील अनु.जाती / जमातिच्यां लोकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या व पदाधिकारी कार्यकर्ते वतीने यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

    दि.12 रोजी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यातिल अनेक गावांमध्ये अनु.जाती / जमातिचे तसेच इतर गोरगरिब मोठया प्रमाणात वास्तव्यास असुन ते आजही त्यांच्या मुलभुत हक्कापासून वंचित आहेत तसेच काही लोक जाणिव पुर्वक त्यांच्यावर अन्याय करित आहेत त्यात काही ग्रामसेवक , आरोग्यसेवक,आशावर्कर , अंगणवाडी सेविका,स्वस्त धान्य दुकानदार,शिक्षक,ठेकेदार असे अनेकांचा समावेश आहे.तरी आपण या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करून खालील नमुद असलेल्या गावनिव्हाय गांवातील समस्यांचे निराकरण करून त्यांना त्यांचा मुलभुत अधिकार व त्यांचे हक्क मिळवून दयावे.

    समस्याग्रस्त गाव व त्यातिल समस्या पुढील प्रमाणे-

    १) मारुळ ग्रामपंचायत हद्दीतिल चारमळी गाव येथे पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी,तसेच चारमळी गावात विजचे खांब टाकून विज जोडणी करण्यात यावी,गावांतर्गत रस्ते झाले पाहिजे,बालकांनकरिता अंगणवाडी झाली पाहिजे,जि.प. शाळेतील शिक्षकांने शासनाची दिशाभूल केली असून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी,प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे,तसेच अंगवाडी सेविकेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी,आदिवासी समाजाला स्वस्त धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

    २)भालशिव ग्रामपंचायतिने दलितवस्तीचा निधी सन २००० ते २०२२ याकालावधीत कुठे,कसा व किती खर्च केला याची चौकशी करावी,टेंभी कुरन सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेत मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई करण्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी,टेंभी कुरुन येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था करावी,टेंभी कुरुन येथिल मतदारांचे नाव भालशिव ग्रामपंचायतिच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे .

    ३)धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी,गावा अंतर्गत रस्ते करण्यात यावे,जि.प.शाळेची इमारत करण्यात यावी,स्वस्त धान्य मिळावे

    ४)सांगवी बु.॥ येथील भिल्ल समाजाकरिता तात्काळ दफनभुमीची जागा मिळणे , स्वस्त धान्य मिळणे,सन २०११ च्या शासन निर्णया प्रमाणे भिल्ल समाज रहात असलेल्या घरांची नमुना नं.८ला नोंद होणे.

    ५) अट्रावल येथिल भिल्ल समाज रहात असलेल्या घराची नमुना नं.८ ला नोंद करण्यात यावी, स्वस्त धान्य मिळावे.६) चितोडा गावातिल बेघर भुमिहिन यांना घरकुलाचा लाभ का देण्यात आला नाही,तसेच चितोडा ग्रामपंचायतने आतापर्यंत अपंगांचा पाच टक्के निधी किती वेळेस वितरित केला याची चौकशी करण्यात यावी .

    तसेच यावल तालुक्यातिल चारमळी,धुळेपाड,टेंभी कुरन,सांगवी बु॥,अट्रावल, चितोडा या गावांमध्ये सन २००० ते २०२२ या कालखंडात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किती लाभार्थींना वैयक्तीक शौचालयाचा लाभ देण्यात आला तसेच घरकुल योजनेचा किती लाभार्थींना लाभ देण्यात आला याची माहिती मिळावी व तात्काळ चौकशी करण्यात यावी.

    अनु.जाती /जमातीच्यां लोकांनवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून वरिल नमुद केलेल्या विषयांच्या संदर्भात दि. १५/०९/२०२२ पर्यत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळणे अपेक्षीत आहे अन्यथा दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालय यावल येथे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे,जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम,जेष्ठ कार्यकर्त्या नंदाताई बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे, यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर,यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे ,यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे,यावल तालुका महिला मंच उपाध्यक्षा ज्योतिताई कुरकुरे,तालुका उपाध्यक्ष सय्यद सखावत,तालुका सल्लागार राहुल तायडे,मिलिंद सोनवणे,मांगिलाल भिलाला,सिकारा पावरा,पिंटु भिल,सुपडु भिल व ईतर शेकडो महिला,पुरुष उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना देण्यात आले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.