साईमत, बोदवड : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे योग्य ते निदान करूनच रिमेडीयल, ब्रीज टिचिंग ही पद्धत वापरल्यास विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना समजून त्यांना चांगले यश संपादन करणे सहज शक्य होते. त्यांना वेगवेगळ्या विषयातील संकल्पना समजल्यामुळे मूलभूत पाया कच्चा असल्यास तो पक्का होण्यास मदत होते. परीक्षेत चांगले यश मिळवून आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रा.अरविंद चौधरी यांनी केले.
बोदवड येथील महाविद्यालयातील रेमेडियल टीचिंग आणि ब्रिज कोर्स समितीमार्फत विद्यार्थ्यांसाठी ‘रिमेडीयल टिचिंगचे महत्त्व’ विषयावर प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांचे व्याख्यानाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी काही टिप्स दिल्या. यशस्वीतेसाठी कांचन दमाडे, विशाल जोशी, रूपाली चौधरी, अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समितीप्रमुख डॉ. रुपेश मोरे तर सूत्रसंचालन चंचल बडगुजर यांनी केले.