एनडीए विरूध्द इंडीया : मुंबईत एकाच दिवशी दोघांची बैठक

0
9

साईमत, मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या एनडीए युतीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे काम सुरु आहे. विरोधकांनी या आघाडीचे नाव इंडिया असे ठेवले आहे. या आघाडीची बैठक मुंबईत होत असताना आता एनडीएने देखील त्याच दिवशी मुंबईत बैठकीचे आय़ोजन केले आहे.
‌‘इंडीया‌’ची बैठक १ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर राज्यातील एनडीएची बैठक १ सप्टेंबरलाच आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचा एकनाथ िंशदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सहभागी होणार आहे.

प्रागतिक विकास मंच इंडियात जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समाव्ोश असलेला ‘प्रागतिक विकास मंच’ मुंबईत होत असलेल्या ‘इंडिया आघाडी’ मध्ये सामील होणार आहे.

४ पक्ष आघाडीच्या संपर्कात
याचव्ोळी एनडीएच्या बैठकीत सहभागी ३८ पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नवा लोगोही जाहीर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here