साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
भारतातील अनेक विरोधी पक्षांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजपाच्यावतीने विनाकारण त्रास देऊन दबावाचे राजकारण केले जात आहे. देशातील अनेक गंभीर प्रश्न बाजूला सारून केवळ द्वेषाचे राजकारण केले जात आहे. रोजगार निर्मिती, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा अनेक दिवसांपासून संप सुरूच आहे. पण याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना लक्ष केले जात आहे. रोहित पवार हे राज्यातील एक सक्षम नेतृत्व असून शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. ते इडीला न घाबरता पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकदीने उभा आहे. त्याकरीता राष्ट्रवादी पार्टी मलकापूर तालुका व शहरच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून इडी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपुरे, राज्य संघटक अनिल झोपे, जिल्हा महिला अध्यक्ष वनिता गायकवाड, ग्राहक संरक्षणच्या राज्य उपाध्यक्ष उषा वनारे, शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष एस. पी. संबारे, सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुरडकर, गजानन आढाव, जिल्हा सचिव संजय जाधव, युवा नेते श्रीराम खोडके, विजय मोरे, गणेश गायकवाड, एकनाथ संबारे, अमित झनके, विनोद व्यवहारे, विजय झनके, रामभाऊ कल्याणकर उपस्थित होते.