राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला किरकोळ मार

0
64

साईमत लाईव्ह प्रतिनिधी

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला झालेल्या अपघाताच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली असून स्वत: धनंजय मुंडेंनी हे ट्वीट रीट्वीट केलं आहे.

धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला असून धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये

धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असला तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने ट्विट करत म्हटलं, साहेबांची प्रकृती ठीक असून, काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here