साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुका हा १००% डोंगरीभाग असल्याने हा तालुका सोयगाव सिल्लोड विधानसभा मतदारसंघात जोडला गेला आहे तसेच या मतदारसंघासाठी दोन आमदार व दोन खासदार आहेत तरी त्या दृष्टीने सोयगाव तालुका विकासापासून कोसो दूर आहे, तसेच जिल्हा परिषदेचे तीन सदस्य असून एकूण सहा पंचायत समिती गण आहेत १/५ सर्कल कन्नड मतदार संघ,१/५ सिल्लोड मतदार संघ असल्यामुळे जि. प. सदस्यांचा निधी देखील खर्च करण्यास मतदारसंघात अडचण येत असते त्यामुळे विकासकामांना अडथळा येत असतो याप्रकारे तालुक्यातील परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाला देखील अडचणीचा सामना करावा लागतो.
तरी सोयगाव तालुका हा एकाच विधानसभा मतदारसंघात जोडावा अन्यथा पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण सोयगाव तालुका हा बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे याविषयीचे निवेदन राष्ट्रवादीचे सोयगाव तालुका अध्यक्ष डॉ. इंद्रजीत सोळंके शहर अध्यक्ष रवींद्र काळे, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती लोखंडे, कृष्णा पाटील अनिस तडवी, करीम देशमुख, इब्राहिम देशमुख, आबासाहेब बाविस्कर शफिक भाई, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्त्यांनी सोयगाव तहसीलदार यांना दिले आहे तसेच सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पिक विमा व अतिवृष्टीची मदत मदत लवकरात लवकर करण्यात यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.