साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
नगरपरीषदेचा मुख्याधिकारी यांचा चार्ज तात्पुरता चोपडा नगरपरीषद मुख्याधिकारी यांचे कडे आहे.परंतु यावल येथील लोकसंख्या व नगर परिषदेच्या कामकाजाची व्याप्ती पाहता शहर विकासाच्या दृष्टीने नियोजन शुन्य व विकासात्मक कामे व्यवस्थीत होत नाहीत. पर्यायी यावल नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करीत केली आहे.
चोपडा येथील यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी यांना यावल साठी पुरेसा वेळ मिळत नसल्या कारणाने यावल शहरातील लोकांच्या मुलभुत अडचणी वेळेवर सुटू शकत नाहीत तसेच निवडणुक प्रकीया लांबणीवर पडल्यामुळे नगरसेवक नसुन प्रशासक नियुक्ती आहे,तरी शहरातील अडचणी खुप वाढत असुन त्यांचा निपटारा करणेकामी प्रशासन अपुर्ण पडत आहे.तरी यावल शहर विकासाच्या दृष्टीने व लोकांच्या आरोग्याचा व शहर व्याप्ती व इतर समस्यांचा विचार करता यावल येथे कायम स्वरुपी मुख्याधिकारी मिळावा अन्यथा आंदोलन
करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी यावल तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे दिला आहे.
यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस यावल शहर कार्याध्यक्ष मोहसीन खान अब्दुल वहाब यांच्यासह प्राध्यापक मुकेश येवले,अब्दुल सहिद भाई, गुणवंत निळ,प्रतिभा निळ, अरुण लोखंडे,मोहसीन खान,कामराज घारू,फारूक हाजी,बापू जासूद,आरिफ भाईखान,इजाज मन्यार, अनिकेत तडवी,आसिफ शेख,आबिद कच्ची,इरफान खान,जुनेद,नीलिमा धांडे ललित पाटील,शरीफ गुलशेर तडवी, प्रकाश पारधे सर यांनी स्वाक्षरी केली आहे.