नवापुरला महसूल सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

0
11

साईमत, नवापूर । प्रतिनिधी

येथील तहसील कार्यालयात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यासाठी शासनाचे निर्देश होते. त्या अनुषंगाने १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये २ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ या कार्यक्रमा अंतर्गत या दिवशी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे १७ ते १८ वर्ष वयावरील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मतदार नोंदणी कामी माहिती देण्यात आली. त्यांना मोठया संख्येने मतदार नोंदणी करावी, याबाबत तहसीलदार महेश पवार यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य मंदा गावित यांनी मार्गदर्शन केले. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना २५ आदिवास दाखले, १८ राष्ट्रीयत्वाचे दाखले, ५ जातीचे दाखले, ३० उत्पन्नाचे दाखले असे विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ३ ऑगस्ट रोजी विसरवाडी येथे ‘एक हात मदती’च्या या उपक्रमा अंतर्गत संजय गांधी योजनेच्या ६५ लाभार्थी यांना मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले. त्याठिकाणी उत्पनाचे दाखले व जातीचे दाखले, आदिवासी दाखले असे विविध प्रकारचे ९० दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचा सातबारावरील बोजे कमी करण्यात आले. तसेच त्यांचे जमिन वाटणी संदर्भातील आदेश करण्यात आले. तसेच महसूल तक्रारीचे निवारण करण्यात आले. ५ ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत माजी सैनिकांना तहसील कार्यालयात बोलावून त्यांना प्रमाणपत्र देऊन तहसीलदार महेश पवार यांनी सन्मानित केले. ६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या तहसीलदार पवार यांनी जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले. सर्व कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी कशा पध्दतीने जनतेचे कामे करावीत याबाबत मार्गदर्शन केले. सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभात कार्यक्रमास आ.शिरीषकुमार नाईक यांच्या उपस्थित सांगता समारंभ करण्यात आला. त्यात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण व लाभार्थींना रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात आमदार शिरीषकुमार नाईक, तहसीलदार महेश पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप, दिलीप कुलकर्णी यांच्यासह तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व तहसीलचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here