राष्ट्रवादी पक्ष अन्‌‍‍ घड्याळ कुणाचंं?

0
57

नवीदिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्याने फुट पडली आहे.त्यांचे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले असून याप्रकरणी आज(शुक्रवारी)सुनावणी झाली.या सुनावणीवेळी खुद्द शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते.दोन तास ही सुनावणी चालली. सुनावणी झाल्यानंतर राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी, अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केला असल्याचा दावाही सिंघवी यांनी केला आहे.
अभिषेक सिंघवी म्हणाले की, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन मुद्दे उपस्थित केले. पहिला म्हणजे आमची बाजू ऐकून न घेता पक्षात वाद असल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असू शकतो.त्यामुळे आधी आमची बाजू ऐकून घ्या आणि मगच निर्णय जाहीर करा,असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे.
“निवडणूक आयोगाने म्हटले आहे की,आमचा हा विरोध प्राथमिक रुपात मानता येणार नाही परंतु आम्हाला आश्वस्त केले आहे की, याचिकाकर्त्याचा युक्तीवाद झाल्यानंतर आमचे म्हणणे ऐकले जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

काल्पनिक वाद निर्माण केला
“कोणताही व्यक्ती, खोटे कागदपत्र सादर करून हे नाही सांगू शकत की वाद आहेत.काल्पनिक वाद निर्माण करून दोन गट दाखवू शकत नाही.काल्पनिक वादासंदर्भात आम्ही युक्तीवाद करू शकतो. हा मुद्दा प्राथमिक रुपात ठेवला आहे.नंतर आम्ही विस्ताराने हा मुद्दा मांडणार आहोत, असेही ते म्हणाले.

मृत व्यक्तींची कागदपत्र दाखवली
“मृत व्यक्तींची कागदपत्रे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. इतर पक्षातील बडा नेता आमच्या गटात असल्याचेही अजित पवार गटाकडून सांगण्यात आले आहे.आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवारच आहेत,” असे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.
पुढील सुनावणी सोमवारी
आज दोन तास सुनावणी झाल्यानंतर आता पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे. सोमवारी सायंकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे.

अजित पवार गटाचा युक्तीवाद
विधानसभेचे 42 आमदार, विधानपरिषदेचे 6 आमदार, नागालँडमधील 7 आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रत्येकी एक खासदार अजित पवार गटाकडे आहेत. अजित पवार यांची 30 जूनला बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली.पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याबरोबर आहेत.विधानसभा, विधानपरिषदेचे अधिक संंख्याबळ आमच्याकडे आहे. कोअर कमिटीतील सदस्यही आमच्याबरोबर आहेत. अनेक वर्षापासून पक्षांर्तंगत निवडणुका झाल्या नाहीत, असा युक्तीवाद अजित पवार गटाने केला आहे.

शरद पवार गटाचा युक्तीवाद काय?
राज्य आणि बाहेरही पक्ष कुणाचा? सर्वांना माहिती आहे.अजित पवार गटाची पक्षाच्या विरोधात भूमिका आहे. अजित पवार गटाने पक्षाची भूमिका पाळली नाही.एक गट बाहेर पडला,मूळ पक्ष आमच्याकडे आहे.24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांंचा शरद पवारांना पाठिंबा आहे. पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली. शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून आहे.त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलता येत नाहीत. शरद पवारांचे नेतृत्व मान्य असे पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे. निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका,असा युक्तीवाद शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here