साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी
आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा आणि फिटनेसची संस्कृती रुजविण्यासाठी विविध मैदानी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत यांनी हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी फिट इंडिया मोहिमेची सामूहिक शपथ घेण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील, रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी, क्रीडा संचालक प्रा. विनीश चंद्रन, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अंकुश खोब्रागडे उपस्थित होते.
स्पर्धेत ९० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यशस्वी स्पर्धकांना प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात शरद रमेश वळवी यांनी प्रथम, दीपक वाजा वसावे यांनी द्वितीय तर लालसिंग सेसऱ्या यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच महिला गटात वंजारी सीपा राऊत प्रथम, माधवीबेन वसावे द्वितीय, दशरावती तडवी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भरत पाटील, प्रा. गोपाल शेंडे, प्रा. डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. डॉ. मोहम्मद जुबेर शेख, प्रा. डॉ. योगेश दुशिंग, प्रा. डॉ. विनोद जोगदंड, प्रा. गोटू सूर्यवंशी, योगेश महाजन, कांतिलाल पाटील, मनीष पाटील, भरत साळवे, अंकुश ठाकरे, प्रशांत पिंपरे, दिनेश ईशी, भगवान पाटील यांनी परिश्रम घेतले.