Nationalist Congress In Jalgaon : ‘नाथाभाऊं’च्या समर्थनार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसही उतरली मैदानात

0
54

रा.काँ. (शरद पवार गट) तर्फे आ. खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

महाराष्ट्राचे नेते तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्याबद्दल ‘आक्षेप आहे’ वक्तव्य केल्याचा खोटा कांगावा करून भाजप आणि ‘हनीट्रॅप’च्या विषयाने बदनाम होत असल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या केसेस करणे, नाथाभाऊंना बदनाम करण्यासाठी महायुतीच्या नावाने ८ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येऊन आ. खडसे यांच्या प्रतिमेला शाईसह काळे फासण्याचा केविलवाणा प्रकार करण्यात आला. त्यांच्या अशा कृत्याचा निषेध म्हणून ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे आ.खडसे यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाचा घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, रा.यु.काँ.चे जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, युवक शहर अध्यक्ष रिंकू चौधरी, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, मजहर पठाण, राजू मोर, रिजवान खाटीक, इब्राहिम तडवी, जयप्रकाश चांग्रे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, प्रमोद पाटील, कलाबाई शिरसाठ, संजय पाटील, आशिफ शेख, आकाश हिवाळे, चेतन पवार, संजय जाधव, सुहास चौधरी, अमजद खाटीक, इम्रान खान, फारुक शेख, कैलास पाटील, रफिक पटेल, भल्ला तडवी, गणेश पाटील, प्रभाकर माळी, अविनाश माहिरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here