‘Shri”s Palanquin with jubilation : नशिराबादला ‘श्रींच्या’ पालखीचे जल्लोषात स्वागत

0
4

रामेश्वर कॉलनीतून निघाली होती पालखी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

प.पू. झिपरु अण्णा महाराजांच्या ७६व्या पुण्यतिथीनिमित्त जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे रामेश्वर काॅलनी येथुन निघालेल्या ‘श्रींच्या’ पालखीचे नशिराबाद येथील झिपरु अण्णा नगर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रामेश्वर कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात सकाळी युवक मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार देविदास डहाके त्यांच्या पत्नी विजया डहाके यांच्या हस्ते गणपती, गजानन महाराज, हनुमंत, भगवान जिव्हेश्वर, प.पू. झिपरु अण्णा महाराज यांच्या आरतीने सुरुवात करुन अण्णांच्या पालखीचे पूजन करुन पालखी रवाना झाली होती. सुरत येथील केंद्र समितीचे सहखजिनदार भजन सम्राट आनंद सातपुते, केंद्र समितीचे माजी अध्यक्ष विलास गरुड, दीपाली खंडारे यांनी प.पू.अण्णांच्या भजनाने सर्व वातावरण भक्तीमय केले. त्यामुळे उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी महासभेचे अध्यक्ष सोमनाथ कासटकर, अखिल भारतीय मंडळाच्या उपाध्यक्षा शैलजा कासटकर, महासभेचे उपाध्यक्ष रत्नाकर साखरे, स्थानिक जिव्हेश्वर मडंळाचे संस्थापक-अध्यक्ष अरुण डहाके, तारा डहाके, अ.भा.साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे, बाळकृष्ण डहाके, सदस्यांमध्ये दत्तात्रय डहाके, एकनाथ वैद्य, दिनेश साळी, मनिष वाझट, अक्षय खंडारे, रत्ना खंडारे, पुष्पा आदमने, लिलाबाई काळमेख, शेखर काळमेख, स्थानिक मंडळाचे खजिनदार गणेश भोगरे, सरला भोगरे, सचिव किशोर खंडारे, नेहा खंडारे, सहसचिव पद्माकर आखडकर, कल्पना आखडकर, उषाबाई खंडारे, योगिता धरम, प्रियंका आखडकर आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी गजानन महाराज मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष राजाभाऊ जोशी, अध्यक्ष किशोर कोलते, मनोहर भालेराव, महिला सदस्या देवयानी कोलते, रेखा वायकोळे, निलिमा पाटील, हर्षा पाटील, सपना निळे, सोनल डहाके, समर्थ खंडारे आदींनी परिश्रम घेतले.

सपत्नीक पालखीची महाआरती

नशिराबाद येथे श्रींच्या पालखीचे आगमन झाल्यावर मंदिराचे ट्रस्ट्री विनायक वाणी यांनी आणि नानाशेठ चिंचकर, अण्णाचे नातू रमेश लाडके सुरत यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी पालखी मंडळाचे प्रमुख सुधीर-दीपाली खंडारे, किशोर-नेहा खंडारे यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here