नवीदिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जीवन बीमा पॉलिसी नाही. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीख संपली आहे. पीएम मोदी यांच्या बँक खात्यात हजाराहून कमी म्हणजे केवळ ५७४ रुपये आहेत.
३१ मार्च २०२३ पर्यंत पीएम मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्याकडे कोणताही शेअर नाहीत किंवा म्युच्यूअल फंडमध्ये त्यांची गुंतवणूक नाही. इतकेच काय तर पीएम मोदी यांच्या नावावर एकही कार नाही.
पीएमओ वेबसाईटवर माहिती
ही सर्व माहिती प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या म्हणजे पीएमओच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. यावर पीएम मोदी यांच्या सर्व संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदी यांच्याकडे सोन्याच्या चार रिंग आहेत, ज्याची किंमत २ लाख १ हजार ६६० रु.इतकी आहे. याशिवाय कोणतीही प्रॉपर्टी पीएमच्या नावावर
नाही.
पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सर्व संपत्तीची मोजदाद केली तर पीएम मोदी यांची एकूण संपत्ती २ कोटी ५८ लाख ९६ हजार रुपये इतकी आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी दरवर्षी ही माहिती दिली जाते. गेल्यावर्षीच्या तुलनेत पीएम मोदी यांच्या संपत्तीत चार टक्के वाढ झाली आहे.