साईमत नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी दोन वर्षांपासून पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. त्याला आता यश मिळाले असून जिल्हा अमली पदार्थ मुक्त झाला आहे. त्याची घोषणा नाशिक विभागाचे विशेष पोलीस अधीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सात हजार विद्यार्थ्यांनी एकाच व्ोळी अंमली पदार्थ मुक्त शपथ घेतली.
राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने सोशल पोलिसिंग करून शाळा महाविद्यालयात जनजागृती केली. गावागावात जाऊन ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करून गावागावात जनजागृती केली. त्यातून जिल्हा अमली पदार्थ मुक्त जिल्हा झाला आहे. यासाठीचा कार्यक्रम शुक्रवारी नंदुरबार जिल्हा पोलीस मैदानावर झाला. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळांचे सात हजार विद्यार्थी उपस्थित होते. याव्ोळी उपस्थित विद्यार्थी पालक आणि उपस्थितांनी अमली पदार्थ मुक्त जिल्हा कायम ठेवण्यासाठी शपथ घेतली.