Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Nandurbar : कृषी अधिकारी कार्यालयातील २० लाखांचा GST घोटाळा; कर सल्लागारासह आरोपींविरुद्ध गुन्हा
    जळगाव

    Nandurbar : कृषी अधिकारी कार्यालयातील २० लाखांचा GST घोटाळा; कर सल्लागारासह आरोपींविरुद्ध गुन्हा

    saimatBy saimatMarch 20, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / नंदुरबार / प्रतिनिधी

    नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल २० लाख ५० हजार १४८ रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. तपासात असे स्पष्ट झाले आहे की तत्कालीन तालुका कृषी अधिकारी व निवृत्त कृषी उपसंचालक वसंत धर्मराज चौधरी आणि कर सल्लागार राकेश भालचंद्र कोठावदे यांनी GST रक्कम संगनमताने अपहार केली.

    या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून राकेश कोठावदे याला अटक करण्यात आली आहे. प्रशासनात या घोटाळ्याने मोठी खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते २०२० दरम्यान वसंत चौधरी नवापूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या काळात मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत विविध कामे करण्यात आली होती. शासन नियमानुसार या कामांवर GST भरणे आवश्यक होते. वसंत चौधरी यांनी राकेश कोठावदे यांच्याकडे सुमारे ३० लाख ३३ हजार १७० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला, मात्र केवळ ९ लाख ८३ हजार ०२२ रुपयेच शासनाकडे जमा झाले. उर्वरित २० लाख ५० हजार १४८ रुपये या दोघांनी संगनमताने अपहार करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

    घोटाळा लपवण्यासाठी आरोपींनी कार्यालयातील मयत लिपिक किरण झिंगा कन्हैय्या यांच्या नावाने बनावट व्हाऊचर तयार केले. त्यावर संबंधित रक्कम परत दिल्याचे दाखवण्यात आले, तसेच खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तपासात हे व्हाऊचर पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले आहे.

    सध्याचे तालुका कृषी अधिकारी रविशंकर गेमसिंग पाडवी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी तत्काळ कारवाई करत तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक अभिजित किशोर अहिरे हे तपास करत आहेत. भारतीय दंड संहितेतील विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमत या गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    शासकीय निधीच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनीच घोटाळा केला असल्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई होईल की नाही आणि या घोटाळ्यामागे आणखी कोणाचा हात आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव क्रिकेट उत्सव: JCL 2026 – पर्व 2; T20 थरार घेऊन येणार, स्थानिक खेळाडूंना सुवर्णसंधी

    March 20, 2026

    Dharangaon : धरणगाव तालुक्यातील जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीवर गुन्हा नोंद

    March 20, 2026

    Jalgaon : आर आर विद्यालयात गुढीपाडवा उत्सव: मराठी नववर्षाचे स्वागत ‘स्वररंग’ कार्यक्रमाने

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.