नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त

0
11

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून झालेल्या अंकेक्षणातून ” अ “दर्जा प्रदान करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून दर तीन वर्षासाठी शैक्षणिक अंकेक्षन केले जाते. त्याप्रमाणे महाविद्यालयाने तीन वर्षाची कामकाजाची संपूर्ण माहिती विद्यापीठाकडे ऑनलाइन अर्ज करून पाठविले होती. अनेक बाबींची माहिती महाविद्यालयाने विद्यापीठाला सादर केली होती. विद्यापीठाने संपूर्ण माहितीची खात्री करून महाविद्यालयाला ” अ “दर्जा प्राप्त असल्याचे कळविले.

महाविद्यालयाचा शैक्षणिक व गुणात्मक आलेख उंचावण्यासाठी कर्मवीर शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांचे आशीर्वाद तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण, संस्थेचे उपाध्यक्ष पुष्पा भोसले, संस्थेचे सहसचिव जयवंतराव साळुंखे, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांचे आशीर्वाद, प्रेरणा व प्रोत्साहन आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांची एकजूट, प्रामाणिक प्रयत्न,आजी-माजी विद्यार्थी बंधू भगिनी,पालक या सर्वांचे सहकार्य यामुळे महाविद्यालयात सलग तिसऱ्यांदा ” अ ” दर्जा प्राप्त झाला आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव यांनी कळवताना आनंद व्यक्त केला.

विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणातून महाविद्यालयाला तिसऱ्यांदा ” अ ” दर्जा प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ.विनायक चव्हाण, उपाध्यक्ष पुष्पा भोसले, सचिव बाळासाहेब चव्हाण, सहसचिव रावसाहेब साळुंखे, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, संस्थेचे सन्माननीय सभासद बंधू भगिनी, महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी चाळीसगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, सेक्रेटरी व पत्रकार मित्र मंडळांचे संचालक मंडळ यांनी यांनी प्राचार्य डॉ एस आर जाधव व प्राध्यापक बंधूचे अभिनंदन केले आहे. संस्थेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी सदस्यांनी अभिनंदन केले आहे सदस्य आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here