साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजय नाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संस्थेचे कार्याध्यक्ष तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत पाटील यांच्यातर्फे ‘नमो नवमतदाता’ संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात नवलभाऊ प्रतिष्ठान अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. भव्य अशा डिजिटल स्क्रीनवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मतदार तथा विद्यार्थ्यांशी थेट संवादाचे लाईव्ह प्रक्षेपण केले होते.
प्रास्ताविक आर्मी स्कुल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी.एम.कोळी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून भारताची प्रगतीकडे असलेली वाटचाल व त्यात युवकांचा सहभाग याविषयी सांगून नवीन मतदार नोंदणीमध्ये युवकांनी सक्रिय रहावे, याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस.जे.शेख, प्राचार्य गायत्री भदाणे, प्राचार्य डॉ. पी.पी.चौधरी, प्राचार्य के. बी. बाविस्कर, प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, प्रा. के.वाय.देवरे, प्रा. डॉ.जे.एन.चव्हाण, प्रा. उषा पाटील, प्रा. साळुंखे, सुधीर पाटील तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तांत्रिक सहकार्य संगणक शिक्षक एस.एन.महाले, व्ही. डी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील तर आभार प्रसिद्धी प्रमुख अनिल पाटील यांनी मानले.