साईमत प्रतिनिधी | दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मंत्री यांच्या तिसऱ्यावेळी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर त्यात सहभागी खासदार ना.श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे.

श्रीमती रक्षाताई खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्री चिराग पासवान हे असून त्यांच्या सोबत रक्षाताई खडसे यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. आज त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे.केंद्रीय मंत्री श्री.मनसुख मांडवीया यांनी रक्षाताई यांना पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.



